Thursday, December 10, 2009


स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रायटनच्या समुद किना-यावर लिहिलेल्या ' ने मजसी ने परत मातृभूमीला , सागरा प्राण तळमळला.. ' या काव्याला १० डिसेंबरला शंभर वर्षे पूर्ण झाली.

शंभर वर्षानंतर आजही या ओळी अंगावर रोमांच उभे करतात आणि आत खोल कुठेतरी प्रेरणेचे स्फुल्लिंग जागृत करतात. ब्रायटनच्या किना-यावर चिंतन करत असताना, तात्यारावांच्या मनात आत मातृभूमीची ओढ लागली होती. त्या भावनावेगातच त्यांना हे उत्कट काव्य स्फुरले. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे मित्र निरंजन पाल होते.

२७ मे १९३८ रोजी ' मराठा ' या वृत्तपत्रात हे काव्य प्रसिद्ध झाले. भा. द. खेर यांनी लिहिलेल्या सावरकरचरित्रात तात्यारावांनी १० डिसेंबर १९०९ रोजी हे काव्य लिहिल्याचा उल्लेख केला आहे.

या शतकपूर्तीनिमित्त सावरकरांच्या ओजस्वी शब्दातील या संपूर्ण काव्याचे हे शब्दस्मरण...


सागरास...

ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा , प्राण तळमळला
भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू
तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन । त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी
तव अधिक शक्त उध्दरणी । मी
येइन त्वरें कथुन सोडिलें तिजला । सागरा , प्राण तळमळला
शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु यापुढती । दशदिशा तमोमय होती
गुण-सुमनें मी वेचियली ह्या भावें । कीं तिने सुगंधा घ्यावें
जरि उध्दरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा , प्राण तळमळला
नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य , मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंच्या
भुलविणें व्यर्थं हें आता । रे
बहु जिवलग गमतें चित्ता । रे
तुज सरित्पते । जी सरिता । रे
तद्विरहाची शपथ घालितो तुजला । सागरा , प्राण तळमळला
या फेन-मिषें हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमीतें
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी । मज विवासनातें देशी
तरि आंग्लभूमी-भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे
कथिल हें अगस्तिस आता । रे
जो आचमनी एक पळीं तुज प्याला । सागरा , प्राण तळमळला

Sunday, December 7, 2008

अंतू बर्वा

रत्नागिरीच्या त्या मधल्या आळीत लोकोत्तर पुरूष रहातात.देवाने ही माणसांची एक निराळीच घडण केली आहे. त्यांच्यात रत्नागिरीच्या लाल चिर्‍याचे, नारळ-फणसांचे,खाजर्‍या अळवाचे आणि फट म्हणताच प्राण कंठाशी आणणार्‍या ओल्या सुपारीचे गुण अगदी एकवटून आहेत. रत्नागिरीच्या शितातच ही भुतावळ लपली आहे की पाण्यातच प्राणवायु नि प्राणवायूच्या जोडीला आणखी कसला वायु मिसळला आहे ते त्या रत्नांग्रीच्या विश्र्वेश्र्वरालाच ठाऊक.अंतू बरवा ह्याच मातीत उगवला आणि पिकला. वास्तविक अंतू बरव्याला कुणी अंतू असे एकेरी म्हणावे असे त्याचे वय नव्हे. मी बाराचौदा वर्षांपूर्वी त्यांना प्रथम पाहिले त्या वेळीच त्यांच्या दाढीचे खुंट आणि छातीवरचे केस पिकलेले होते. दातांचा बराचसा अण्णू गोगट्या झाला होता. अण्णू गोगट्या होणे म्हणजे 'पडणे' हा अंतूने मराठी भाषेला बहाल केलेला वाक्प्रचार आहे. रत्नांग्रीचा अण्णू गोगटे वकील कित्येक वर्षे ओळीने मुन्शिपाल्टीच्या निवडणूकीत पडत आला आहे. तेव्हापासून विहिरीत पोहरा पडला तरी पोहर्‍याचा"'अण्णू' झाला काय रे?" म्हणून अंतू ओरडतो.समोरासमोर अंतूला कोणी अंतू म्हणत नाही. परंतु उल्लेख मात्र सहसा एकेरी. किंबहुना, कोकणातली मंडळी एकूणच एकवचनी. पण अंतूला संबोधन 'अंतूशेट' हे आहे. ह्या चित्पावनाला ही वैश्यवृत्तीची उपाधी फार प्राचीन काळी चिकटली. अंतूच्या हातून ते पाप घडले होते. पहिल्या महायुध्दाच्या वेळी अंतूने बंदरावर कसले तरी दुकान काढले होते. ते केव्हाच बुडाले. परंतु 'अंतूशेट'व्हायला ते कारण पुरेसे होते. त्यानंतर अंतूने पोटापाण्याचा काही उद्योग केल्याचे कोणाच्या स्मरणात नाही. दोन वेळच्या भाताची त्याची कुठेतरी सोय आहे. थोडीशी जमीन आहे. नारळीची पाचपंचवीस, पोफळीची दहापंधरा आणि रातांबीची काही अशी झाडे आहेत. दोनपाच हापूस आंब्याची आहेत. कुठे फणस, चिंच उभी आहे. वाडवडिलार्जीत घराच्या वाटणीत एक पडवी आणि खोली आली आहे. विहीरीवर वहिवाटीचा हक्क आहे. ह्या सगळ्या आधारावर अंतूशेट उभे आहेत.त्यांची आणि माझी पहिली भेट बापू हेगिष्ट्याच्या दुकानात झाली. मी सिगरेट घ्यायला गेलो होतो आणि 'केसरी'च्या मागून अर्धा जस्ती काड्यांचा चष्मा कपाळावर घेत अंतूशेटनी तडक प्रश्न केला होता, ""वकीलसाहेबांचे जावई ना ?""हो!""झटक्यात ओळखलेंच मी! बसा! बापू, जावयबापूंना चहा मागवा"एकदम इतक्या सलगीत आलेला म्हातारा कोण हे मला कळेना. पण अंतूशेटनीच खुलासा केला. "तुमचे सासरे दोस्त हो आमचे. सांगा त्यांना अंतू बरवा विचारीत होता म्हणून.""ठीक आहे !""केव्हा आलात पुण्याहून ?""परवाच आलो.""बरोबर. दिवाळसण असेल. मागा चांगली फोर्ड गाडी! काय?""तुमचे दोस्त आहेत ना, तुम्हीच सांगा.""वा! पुण्याचे तुम्ही. बोलण्यात ऐकणार काय आम्हाला! मग मुक्काम आहे की आपली फ्लाईंग व्हिजीट ?""दोनतीन दिवसांनी जाईन !""उत्तम ! थोडक्यात गोडी असते. त्या सड्यावरच्या कपोसकर वकिलाच्या जावयासारखं नका करू. त्यानं सहा महिने तळ ठोकला. शेवटी कपोसकर वकिलान् एक दिवस खळं सारवायास लावलं त्यास ! जास्त दिवस जावई राहिला की तो दशमग्रह होतो. कसं ?""बरोबर आहे !""बापूशेट, ओळखलंत की नाही ? आमच्या वकिलांचे जावई ! आम्ही दोघेही त्यांचेच पक्षकार हो !"हेगिष्ट्यांनी नमस्कार केला."चहा घेता ?""नको हो, उकडतंय फार !" मी म्हणालो."अहो, रत्नांग्रीस उकडायचंच. गोठ्यात निजणार्‍यान् बैलाच्या मुताची घाण येते म्हणून भागेल काय ?" शेवटला 'काय?' वरच्या पट्टीत उडवीत अंतूशेट म्हणाले, "रत्नांग्रीस थंड हवा असती तर शिमला म्हणाले नसते काय आमच्या गावाला ? पण उकाड्याचा तुमच्या सड्यावर अधिक त्रास ! दुपारच्या वेळी मारा सायकलीवर टांग नि थेट या आमच्या पोफळीच्या बागेत झोपायला. पोफळीची बाग म्हणजे एअरकंडिशन हो !" मनमुराद हसत अंतूशेट म्हणाले. वर आणि "आमचा कंट्री विनोद हो जावयबापू" हेही ठेवून दिले."बापूशेट, पाहुणे लेखक आहेत हो. आमच्या आबा शेट्यासारखी नाटकं लिहिली आहेत. फार बोलू नका. नाहीतर तुमच्यावर लिहीतील एखादा फर्मास फार्स !"अंतूशेट बर्व्यांपर्यंत माझी कीर्ती पोहोचल्याचे ऐकून झालेला आनंद बापूशेट हेगिष्ट्याच्या प्रश्नाने मावळला. मला नीट न्याहाळीत बापूशेट म्हणाले, "काय करतात ?""करतात काय म्हंजे ? खुळे की काय तुम्ही हेगिष्टे ? ती रद्दी काढा. दहा ठिकाणी फोटोखाली नाव छापलेलं आढळेल तुम्हाला. सिनेमात असतात.""म्हणता काय ?" हेगिष्टे माझ्याकडे 'अजि म्यां ब्रह्म पाहिलें' असा चेहरा करून पाहत म्हणाले."काय हो जावयबापू, एक विचारू काय ?" मिस्किल प्रश्नाची नांदी चेहर्‍यावर दिसत होती."विचारा की ----""एक सिनेमा काढला की काय मिळतं हो तुम्हाला ?"मी काही कोकणात प्रथमच आलो नव्हतो; त्यामुळे ह्या प्रश्नाला मी सरावलो होतो."ते सिनेमा-सिनेमावर अवलंबून आहे.""नाही, पण आम्ही वाचलंय की एक लाख दीड लाख मिळतात ...""मराठी सिनेमात एवढे कुठले ?""समजा ! पण पाच पूज्यं नसली तरी तीन पूज्यं पडत असतीलच ...""पडतात... कधीकधी बुडतात ही !""अहो, ते चालायचंच ! धंदा म्हटला की चढणं नि बुडणं आलं. आणखी एक विचारू काय ? ...म्हणजे रागावणार नसलात तर...""छे, रागवायचं काय ?""सिनेमातल्या नट्यांबद्दल आम्ही हे जे काही वाचतो ते खरं असतं की आपलं गंगाधर बाष्ट्याच्या अस्सल बेळगावी लोण्यासारखं पीठ मिसळलेलं ?""हे जे काही म्हणजे ?" मी उगीचच वेड पांघरले."वस्ताद हो जावयबापू ! कोर्टात नाव साक्षीदार म्हणून नाव काढाल ! अहो, हे जे काही म्हणजे तर्जनीनासिकान्याय यातला प्रकार म्हणतात ते..."हा तर्जनीनासिकान्याय माझ्या ध्यानात आला नाही. शेवटी अंतूशेतनी आपली तर्जनी नाकपुडीला लावीत साभिनय खुलासा केला. तेवढ्यात हेगिष्ट्यांनी मागवलेला चहा आला. "घ्या" अंतूशेटनी माझ्या हातात कप दिला आणि त्या चहावाल्या पोराला "रत्नांग्रीच्या समस्त म्हयशी तूर्तास गाभण काय रे, झंप्या ?" असे म्हणून जाता जाता चहाच्या रंगावर शेरा मारला आणि बशीत चहा ओतून फुर्र फुर्र फुंकायला सुरवात केली. वास्तवीक त्या पो~याला चहात दूध कमी आहे हे त्यांना सरळ सांगता आले असते. पण अंतूशेटचेच काय, त्यांच्या सा~या आळीचे बोलणे तिरके.अंतूशेटचा आणि माझा परिचय आता जुना झाला. गेल्या दहाबारा वर्षांत मी जितक्या वेळा रत्नागिरीला गेलो तितक्या वेळा मी त्यांना भेटलो. त्यांच्या अड्ड्यात त्यांनी मला जमवूनही घेतले. एकदोनदा गंजिफा शिकवायचा प्रयत्नही केला. आणि त्या साठीच्या आसपास उभ्या असलेल्या वृद्धांच्या अड्ड्यात मग अंतूशेट आणि त्यांचे सांगाती यांचे जीवनविषयक अचाट तत्वज्ञान मी खूप ऐकले. त्यांची विशिष्ट परिभाषा तिथे मला कळली. खांद्यावर पैरणी, कमरेला पंचा, पायात करकरती वहाण,एका हातात दंडा नि दुस~या हातात फणस घेऊन , "रे गोविंदभट, टाकतोस काय दोन डाव ?" किंवा "परांजप्या, जागा आहेस की झाला तुझा अजगर ?" अश्या आरोळ्या मारीत पत्त्यांतले भिडू गोळा करणा~या त्या मंडळीत मीही भटकलो. पत्त्यांचा डाव फारसा रंगला नाही की पाने टाकून, "जावयबापू, म्हणा एखादा मालकंस. गडबोल्या,कूट थोडा तबला पाव्हण्याबरोबर. खातूशेट, उघडा तुमचा खोका." असल्या फर्माईशीनंतर मी आवाजही साफ करून घेत असे."नरड्यात मज्जा आहे हो तुमच्या !" ही दाद इथेच मिळे.वर्षा-दोन-वर्षांतून एखादी फेरी रत्नागिरीला घडे. दर फेरीत मात्र एखादा मेंबर गळाल्याचे कळे."दामूकाका दिसले नाहीत कुठे अंतूशेट !""कोण ? दामू नेना ? तो चैनीत आहे ! वरती रंभा त्याच्या टकलावर तेल थापते आणि उर्वशी पंख्यान् वारा घालते म्हणतात.""म्हणजे ?""अहो, म्हंजे वाघाचे पंजे ! दामू नेन्याची रत्नांग्रीहून झाली बदली !" असे म्हणून अंतूशेटनी आकाशाकडे बोट दाखवले."अरे अरे अरे ! कळलं नाही मला.""अहो, कळणार कसं ? दामू नेना चचला म्हणून रेडिओत का बातमी सांगणार आहेत ? केसरीत आला होता गृह्यसंस्कार झापून. मनमिळाऊ, प्रेमळ व धर्मपरायण होते असा ! छापणारे काय, द्याल ते छापतील. दामू नेना कसला प्रेमळ ? ताटीवर आडवा पडला होता तरी कपाळावरची आठी तशीच ! एके रात्री उकडतांय घरात म्हणून खळ्यात झोपला तो तिथेच संपलेला आढळला पहाटे ! पुण्यवान माणूस. गतवर्षी आषाढीच्या दिवशी गेला वैकुंठालोकी. रत्नांग्रीत दोन पालख्या निघाल्या आषाढीला --- एक विठोबाची नि दुसरी दामू नेन्याची. आषाढात तो गेला आणि विजयादशमीला आमच्या दत्तू परांजप्यान् सीमोल्लंघन केलेनीत. अवघ्या देहाचं सोनं झालं. इजा झाला, बिजा झाला, आता तिजाची वाट पाहतोय !" मिष्किलपणाने खांदा उडवीत अंतूशेट म्हणाले.पाच फुटांच्या आतबाहेरची उंची, तांबूस गोरा वर्ण, तोंडावर बारीक वांगाचे ठिपके, घारे मिचमिचे डोळे, वयोमानाप्रमाणे वाढत चाललेल्या सुरकुत्या, डोक्यावर तेलाच्या कडा उमटलेली टोपी, अंगात अंगरखा, कमरेला गुडघाभर पंचा, पायांत कोकणी वहाणा, दातांची अर्धी पंगत उठून गेलेली, त्यामुळे मोकळ्या हिरड्यांना जीभ लावीत बोलायची खोड आणि ह्या साजासकट वजन सुमारे शंभर पौंड. ह्या सगळ्या जराजीर्ण होत चाललेल्या गोष्टींत एक गोष्ट ताजी म्हणजे सानुनासिक परंतु सुस्पष्ट आवाज आणि डोक्यावर पिढ्यान् पिढ्या थापलेल्या खोबरेल तेलाने दिलेली वंशपरंपरागत तैलबुद्धी ! अंतूशेटच नाही, तर त्या आळीतले त्या वयाचे सारेच नमुने कमीअधिक फरकाने एकाच वळणाचे किंवा आडवळणाचे. भाषेला फुरश्यासारखी पायात गिरकी घेऊन चावायची सवयच झालेली. कुणाचे बरे झाल्याचे सुख नाहीच; वाईट झाल्याचे दुःख नाही. जन्माचे सोयर नाही, मरणाचे सुतक नाही. गाण्याची रुची नाही, तिटकाराही नाही; खाण्यात चवीपेक्षा उदरभरण हाच स्वच्छ हेतू ! आयुष्याची सारवट गाडी वंगण नाही म्हणून कुरकुरली नाही, आहे म्हणून वेगाने पळली नाही. चाल मात्र कोकणी वाटेसारखी सदा नागमोडीची. नशिबात अश्वत्थाम्याघरच्या पिठाच्या दुधाची वाटी ! त्याच्या घरी दुधाचे पीठ झाले. इथे देवाने नारळीचा कल्पवृक्ष दिलेला. पण त्यातल्या खोब~याहून करवंटीची सलगी अधिक !उन्हाळ्यात कुठली तरी मुंबईची दुय्यम नाटक कंपनी झापाच्या थेटरात 'एकच प्याला' घेऊन आली होती. संच जेमतेमच होता. पहिला अंक संपला. बाहेर सोड्याच्या बाटल्यांचे चीत्कार सुरू झाले. किटसनच्या प्रकाशात अंतूशेटची मूर्ती दिसली. अंतूशेट फरक्यापवाल्या मॅनेजरशी चर्चा करत होते."कशी काय गर्दी ?""ठीक आहे !""प्लान तर मोकळाच दिसतोय. सोडता काय अर्ध्या तिकिटात ?""छे ! छे !""अहो, छे छे म्हणून झिटकता काय पाल झाडल्यासारखे ? पहिला अंक ऐकला मी हितूनच. सिंधूच्या पार्ट्यात काय दम दिसत नाही तुमच्या. 'लागे हृदयीं हुरहुर' म्हणजे अगदीच पिचकवणी म्हटलंनीत. बालगंधर्वाचं ऐकलं होतंत काय ?" नेहेमीप्रमाणे शेवटला 'काय' उडवीत अंतूशेट म्हणाले.मॅनेजरही जरा उखडले. "आग्रह नाही आमचा तुम्ही नाटक बघायला चला असा.""गावात आग्रहाचे बोर्ड तर टांगले आहेत --- आणि काल घरोघर जाहिरातीची अक्षतदेखील घेऊन हिंडत होते तुमचे ब्यांडवाले! अहो, एवीतेवी रिकाम्या खुर्चीला नाटक दाखवायचं --- चार आण्यात जमवा.""चार आण्यात बघायला काय डोंबा~याचा खेळ आहे काय ?""अहो तो बरा ! आधी खेळ तो दाखवतो आणि मग थाळी फिरवतो. तुम्ही तसं करा. पुढलं 'कशि या त्यजूं पदाला' जमलं फक्कड तर थाळीत चार आणे आणखी टाकीन." बाजूची मंडळी हसली आणि मॅनेजर उखडला. तेवढ्यात अंतूशेटची नजर माझ्याकडे वळली. "नमस्कार हो जावयबापू...""नमस्कार !""काय जमलाय काय 'एकच प्याला' ? ""ठीक आहे !""फुकट पासात की काय तुम्ही ? बाकी तुम्हीही त्यांतलेच. एक न्हावी दुस~या न्हाव्याच्या दाढीचे पैसे घेत नाही म्हणतात.""'नाही हो. हे पहा तिकीट आहे.""'मग 'ठीक आहे' म्हणून मुळमुळीतसं उत्तर दिलंत ? दमड्या मोजल्या आहेत ना तुम्ही ? तो सिंधूचा पार्टी तर एकदम कंडम वाटला मला.""अहो, सिंधूचा पार्टी कसला ? बाई आहे ती काम करणारी.""सांगताय काय ? कसला तो आवाज नि कसलं ते दिसणं ? मनात आणील तर कडेवर घेईल सुधाकराला. सिंधू कसली ? सिंधूदुर्ग आहे मालवणचा नुसता.""पाहिलंत वाटतं नाटक ?""उगीच जरा. त्या कोप~यातली दोन झापं बाजूला करून पाहिलं घटकाभर... छ्याः ! ह्यांच्यापेक्षा दशावतारी बरे."काही कारण नसताना आपल्या मताची एक पिंक टाकून अंतूशेट निघून गेले. बाकी अशा दिवसरात्र 'पिंका' टाकीतच त्यांचे आयुष्य गेले. अंतूशेटची माझी आता इतक्या वर्षांची ओळख, परंतु त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीविषयी मला फारसे कधीच कळले नाही. त्यांच्याच अड्ड्यातल्या अण्णा सान्यांनी एकदाच फक्त काही माहिती पुरवली होती. कधीतरी त्यांच्या बोलण्यातून अंतूशेटच्या मुलाची उल्लेख आला."'म्हणजे ? अतूशेटना मुलगा आहे ?""आहे ? म्हणजे काय ? चांगला कलेक्टर आहे !""'कलेक्टर ?""भायखळ्याच्या स्टेशनावर तिकिटं गोळा करतो." चेह~यावरची सुरकुती हलू न देता अण्णा म्हणाले."मग वडलांना मदत करीत नाही की काय ?""अहो, करतो कधी कधी. त्यालाही त्याचा संसार आहे. त्यातून बीबीशीआयला जायपीचा डबा जोडलेला ..."ह्या अड्ड्यातले हे विशेष शब्द गोळा केले तर एक स्वतंत्र कोश तयाल होईल. बी बी सी आयला जी आय पीचा डबा जोडणे म्हणजे आंतरजातीय विवाह हे लक्षात यायला मला उशीर लागला."काय लक्षात आलं ना ? तेव्हा अंतूशेटच्या स्नानसंधेची पंचाईत होते. मुलाच्या घरी थोडी इतर आन्हिकंही चालतात म्हणे. आमच्या अंतूशेटचं जमायचं कसं? एकदा सगळा अपमान गिळून नातवाचा चेहरा पाहण्यास गेला होता. गणित चुकल्यासारखा परतला. दसरा-दिवाळीला अंतू बर्व्याला मिळतं आपलं मनिऑर्डरीतून पितृप्रेमाचं पोस्त ! पाचदहा रुपयांचं ! तेवढ्यात फिरतो मिशीला कोकम लावून तूप म्हणून सांगत ! आणि उगीचच खुर्दा खुळखुळवतो चार दिवस खिशात हात घालून.""अहो, तिकिट-कलेक्टरला पगार तो काय असणार ?""पगार बेताचाच, पण चवल्यापावल्यांची आचमनं चालतात म्हणतात. खरंखोटं देव जाणे. आणि चालायचंच ! घेतले तर घेऊ देत .. काय ? अहो, आठ आणे खाल्ले की चौकडीचा मुगूट घालून रत्नागिरीच्या डिस्ट्रिक्ट जेलात घालतात आणि एक लाख खाल्ले की गांधी टोपी घालून पाठवतात असेंब्लीत ! लोकनियुक्त प्रतिनिधी !"राजकारण हा तर अंतूशेटच्या अड्ड्यातला लाडका विषय ! प्रत्येक राजकीय पुढा~यावर आणि तत्वप्रणालीवर मौलिक विचार ! कोकणात दुष्काळ पडला होता. तसा तिथे नेहमीच दुष्काळ. पण हा दुष्काळ अंतूशेटच्या भाषेत सांगायचे म्हणजे 'फ्यामिन आक्टान्वये पास झालेला'! दुष्काळी भागातून नेहरूंचा दौरा चालला होता. गावात धामधूम होती. कोणीतरी संध्याकाळी अंतूशेटना विचारले, "काय अंतूशेट? भाषणास दिसला नाही !" "कुणाच्या न्हेरूच्या ? छ्याट् ! अरे, दुष्काळ पडला हितं .. तर भाषणं कसली देतोस ! तांदूळ दे.! हे म्हणजे भाट्याच्या खाडीत बुडणा~या दालद्याला विश्वेश्वराच्या घाटीवर उभं राहून कुराण वाचून दाखवण्यापैकी आहे. तो तिथे बोंबलतोय आणि हा हितं ... ह्याचा त्यास उपयोग नाही आणि त्याचा ह्यास ! तुम्ही आपले खुळे. आला न्हेरू चालले बघायास ! आणि रत्नांग्रीत दाखवलनीत काय त्यास ? बाळ गंगाधर टिळक जन्मले ती खोली आणि खाट ? गंगाधरपंत टिळकास काय स्वप्नात द्रष्टांत झाला होता काय रे ... तुझ्या बायकोच्या पोटी लोकमान्य जन्मास येणार म्हणून ? कुणाची तरी खाट दाखवली नि दिलं ठोकून त्याच्यावर टिळकानं पहिलं ट्यां केलं म्हणून ! पुरावा काय ? का टिळकाच्या आयशीचं बाळंतपण केलेली सुईण होती साक्षीस ? टिळकाचं सोड ! शंभर वर्षं झाली त्याच्या जन्मास. तू जन्मास आलास ती खोली तुझ्या मातोश्रीस तरी सांगता येईल काय ? म्हातारीस विचारून ये घरी जाऊन आणि मग सांग मला टिळकाच्या आणि न्हेरूच्या गोष्टी."मला नेहमी प्रश्न पडे, की ह्या मंडळीची आदराची स्थानं कोणती ? गावात पंडित आला की त्याला 'पढिक' म्हणून उडव. "बाजारात जाऊन पैशाचं लिंबू आणायास सांग. स्तंभाजवळच्या लायब्ररीत जाईल आणि तिथे मागेल लिंबू !" कुणाचा मुलगा प्रोफेसर झाला हे ऐकल्यावर अंतूशेट चटकन म्हणाले, "सर्कशीत काय हो? पूर्वी एक छत्रे प्रोफेसर होता." कुणी नवे दुकान काढले तर "दिवाळ्याचा अर्ज आत्ताच मागवून ठेव म्हणावं !" हा आशिर्वाद.जीवनाच्या कुठल्या तत्वज्ञानाचा अर्क ही मंडळी प्याली आहेत देव जाणे. त्यांतली निम्म्याहून अधिक माणसे मनिऑर्डरीवर जगतात आणि त्यातले पैसे वाचवून दावे लढवतात. प्रत्येकाची तारीख पडलेली. विशाल सागरतीर आहे, नारळीची बने आहेत, पोफळीच्या बागा आहेत, सारे काही आहे; पण त्या उदात्ततेला दारिद्र्य विलक्षण छेद देऊन जाते आणि मग उरते एक भयाण विनोदाचे अभेद्य कवच !कशावरून तरी गांधींच्या गोष्टी निघाल्या. अंतूशेटनी आपले भाष्य सुरू केले. "अहो, कसला गांधी ? जगभर गेला, पण रत्नांग्रीस फारसा आला नाही. पक्का तो ! त्यास नेमकं ठाऊक --- इथं त्याच्या पंचाचं कौतुक नाही नि दांडीचं नाही. आम्ही सगळेच पंचेवाले नि त्याच्याहीपेक्षा उघडे ! सुताबितात तथ्य नाही हो ! आमचा शंभूशेट जन्मभर जानव्याचं सूत काढीत आला ! ब्रिटिश सरकार सोडा पण रत्नांग्रीचा गिलिगन कलेक्टरदेखील घाबरला नाही ! तिसरं शस्र म्हणजे उपासाचं ! इथे निम्मं कोकण उपाशी ! नेहमी तुपाशी खाणाऱ्यास उपाशी माणसाचं कौतुक. आम्हांस कसलं ? नाही, माणूस असेल मोठा... पण आमच्या हिशेबी त्याच्या मोठेपणाची नोंद करायची कुठल्या खात्यावर ? आणि स्वराज्याचा म्हणाल तर संबंध गांधीशीही नाही, टिळकांशीही नाही नि सावरकांशीही नाही.""म्हणजे स्वराज्य काय आकाशातून पडलं ?""ते कुठून पडलं ते तुम्ही तपासा ! पण इंग्रज गेला कंटाळून. अहो, लुटण्यासारखं काय शिल्लक होतं ? धंदा बुडीत खाती जायला लागला --- फुकलंनीत दिवाळं ! कुंभार मडकी घेऊन गेला, तुम्ही फुंका उकिरडा ! हे सगळं चक्रनेमिक्रमेण होतं. सत्ता इंग्रजाची नाही, न्हेरूची नाही आणि जनतेची नाही. सत्ता आहे विश्वेश्वराची !""मग तुमचा विश्वेश्वर इंग्रजाच्या ताब्यात कसा गेला ?""खुळे की काय तुम्ही ! विश्वेश्वर घट्ट आहे राजिवड्यावर ! अहो, एक खेळ करून दाखवला त्यानं.""दीडशे वर्षांच्या गुलामीचा कसला खेळ ?""'अहो दीडशे वर्षं तुमची ! ब्रह्नदेवाच्या रिष्टवाचातला काटा सेकंदान् देखील सरकत नाही हजार वर्षं ओलांडल्याशिवाय !"कोकणातल्या त्या मधल्या आळीतल्या ओसरीवर, भोवती माडाच्या काळ्या आकृती हलताना कंदिलाच्या प्रकाशात ती थकलेली सुकलेली तोंडे हे तत्वज्ञान सांगू लागली की काळीज हादरते. "अहो, समाजवादाच्या गफ्फा आहेत हो गफ्फा ! अहो, एक आंब्याचं पानदेखील नसतं हो दुसऱ्यासारखं. ब्रह्नदेवाच्या दरबारी प्रत्येक भांडं निराळं. सगळ्या माणसांची नशिबं सारखी होतील कशी '? घटकाभर धरा, तुमचा आला समाजवाद ! तो आमचा रत्नांग्रीचा गावगांधी शिट्ट्या फुंकून फुंकून सांगतो तशी आली कोकण रेल्वे नि गेली पांडू गुरवाच्या परसातून -- म्हणून काय थोट्या पांडबाच्या खांद्याला हाताचे खुंट फुटणार काय ? आणि हात नाहीत म्हणजे मग कसेल त्याची जमीन नि दिसेल त्याची थैली ह्या तुमच्या राज्यात थोटा पांडू कसणार कसा आणि काय ? तो तसाच राहायचा ! स्वराज्य आलं म्हणून हरी साठ्याचा तिरळा डोळा सरळ झाला नाही नि महादेव गडबोल्याचं धोंद आत नाही गेलं ! हे डावंउजवं राहायचंच समाजात ! अहो, रामराज्यातदेखील मारूतीचं शेपूट उपटून रामानं आपल्या पाठीस नाही जोडलं -- हा नरच राहिला नि तो वानरच राहिला."अश्या वेळी अंतूशेटच्या जिभेवर लक्ष्मी नाचते."बरोबर आहे !""उगीच तोंडदेखलं बरोबर आहे म्हणू नका त्या श्यामराव मुरकुट्यासारखं ! चुकत असेल तर कान उपटा ! तुम्ही माझ्याहून लहान खरे, पण शिक्षणान् थोर आहात."अंतूशेटच्या असल्या भाषणात केवळ तिरका विनोद नसतो. त्यांचे कुठेतरी काहीतरी जळत असते. गेल्या चारपाच वर्षांत रत्नागिरीला फार वेळा जाताच आले नाही. आता तिथे वीज आली, कॉलेज आले, डांबरी रस्ते आले, मी दोनतीन वर्षांपूर्वी गेलो तेव्हा अंतूशेटना म्हणालो,"अंतूशेट, रत्नागिरी झकपक झाली हो तुमची ! विजेचे दिवे आले. तुमच्या घरी आली की नाही वीज ?""छे हो, काळोख आहे तो बरा आहे. ! उद्या झकपक प्रकाश पडला तर बघायचं काय ? दळिद्रच ना ? अहो, पोपडे उडालेल्या भिंती नि गळकी कौलं बघायला वीज हो कशाला? आमचं दळिद्र काळोखात दडलेलं बरं !"अंतूशेट मनमुराद हसले. या खेपेला दातांचा जवळजवळ संपूर्ण अण्णू गोगट्या झालेला दिसला. शिवाय अड्ड्यातली आणखीही एकदोन मंडळी 'निजधामाला' गेल्याचे कळले. कधी नाही ती एक कारुण्याची नि गोडव्याची झाक अंतूशेटच्या बोलण्यात मला आढळली. अड्ड्यातल्या रिकाम्या जागा त्यांच्या मनात कुठेतरी घर करून जात असाव्या. जोगळेकरांचा मुलगा दिल्लीस बदलला हो वरच्या जागेवर." अंतूशेट आपण होऊन सांगत होते. म्हाताऱ्याला काशीविश्वेश्वर, हरिद्वार-ह्रृषिकेश घडवून आणलंनीत. मावंदं घातलं जोरदार शंभू जोगळेकरान् ! गंगेच्या पाण्याचा लहानसा गडू शिलबंद करून आठवणीन् घेऊन आला माझ्यासाठी ! पुढच्या खेपेला याल तेव्हा त्याचं शिल फोडून गडू आमच्या तोंडात उपडा झालेला दिसेल हो जावयबापू." पहिल्या भेटीतले संबोधन अजून कायम होते. त्यानंतर गेल्याच वर्षी पुन्हा रत्नागिरीला जाण्याचा योग आला. अंतूशेटच्या घरचा गंगाजलाचा गडू सुदैवाने सीलबंदच होता."वा वा ! कांग्रेचुलेशन हो जावयबापू ! कळलं आम्हांला. जाऊन या हो. एक रिक्वेष्ट आहे. आता इंग्लिश बोललं पाहिजे तुमच्याशी.""कसली रिक्वेस्ट ?""तेवढा कोहिनूर हिरा पाहून या. माझी आपली उगीचच तेवढी इच्छा राहिली हो ! पिंडाला कावळा नाही शिवला तर कोहिनूर कोहिनूर म्हणा. शिवेल ! परत आल्यावर सांगा कसा दिसतो. लंडन, प्यारिस सगळं बघून या." मला उगीचच त्यांच्या पाया पडावे असे वाटले. मी रस्त्यातच त्यांना वाकून नमस्कार केला. "आयुष्यमान् व्हा ! श्रद्धाळू आहात, म्हणून यश आहे हो तुम्हाला."मी निरोप घेतला आणि चार पावले टाकली असतील, लगेच हाक ऐकू आली."ओ जावयबापू --- !""काय अंतूशेट ?""जाताय ते एकटेच की सपत्नीक ?""आम्ही दोघेही जातोय.""हे चांगलं केलंत ! उगीचच एक किडा आला डोक्यात. म्हटलं, परदेशी विद्या शिकायला निघाला आहात --- देवयानीची कथी आठवली. काय ? आमच्या मुलीलाही आशिर्वाद सांगा हो ! तुमचं भाग्य तिच्यामुळं आहे. तुम्हांला म्हणून सांगतो. मनात ठेवा हो. कुठे बोलू नका. चाळीस वर्षांपूर्वी आमची ही गेली. दारचा हापूस तेव्हापासून ह्या घटकेपर्यंत मोहरला नाही. शेकड्यांनी आंबा घेतलाय एके काळी त्या आंब्याचा. पण भाग्य कुठल्या वाटेनं जातं बघा. असो. सुखरूप या. इथून प्रयाण केव्हा ?""उद्या सकाळच्या एस.टी.नं जाणार !""डायरेक्ट मुंबई की काय ?""हे चांगलं केलंत ! एकदा तो प्रवास घडला की त्या चिकाटीवर माणसांनी पृथ्वीप्रदक्षिणा करून यावं. परवा वरच्या आळीतला तात्या जोग जाऊन आला --- अजून हाडांचा हिशेब जमवतोय. सातआठ हाडं हरवली म्हणतो त्या यष्टीत." अंतूशेट सगळे तोंड उघडून हसत होते. आता त्या तोंडात एकच दात लुकलुकत होता.पहाटे पाच वाजता एस.टी. स्टँडवर अंतूशेटची "जावयबापू" ही खणखणीत हाक ऐकू आली. मी चकितच झालो. अंतूशेटनी वैद्याच्या पुडीसारखी एक पुडी माझ्या हाती दिलीय."तुमचा विश्वास नाही, ठाऊक आहे मला. पण एवढी पुडी असू द्या तुमच्या खिशात. विश्वेश्वराचा अंगारा आहे. विमानातून जाणार म्हणून कळलं वकीलसाहेबांकडून. एवढी पुडी जड नाही खिशाला."एस.टी. सुटली आणि अंतूशेटनी आमच्या कुटुंबीयांबरोबर सदरा वर करून आपले म्हातारे मिचमिचे डोळे पुसले. तेवढ्या अंधुक प्रकाशात त्यांचे ते खपाटीला गेलेले पोट चटकन माझ्या डोळ्यावर उगीचच आघात करून गेले. कोकणातल्या फणसासारखीच तिथली माणसेदेखील --- खूप पिकल्याशिवाय गोडवा येत नाही त्यांच्यात.

सखराम गटणे

"सर, हे पेढे--" सखाराम गटण्याने माझ्या हातात एक पुडी ठेवली."कसले रे?""प्राज्ञ परीक्षेत पास झालो.""छान!" प्राज्ञ परीक्षेची पातळी झटकन माझ्या लक्षात आली. "किती पर्सेंट मार्क मिळाले?""अजून गुणांची टक्केवारी कळली नाही. कळल्यावर सांगेन. पण निदान पासष्ट प्रतीशत तरी मिळावेत."सखाराम गटणे प्राज्ञ मराठी बोलतो. पावसाळ्याच्या दिवसांत रस्त्यात भिजलेले एखादे दिनवाणे कुत्रे उचलून आपण घरी आणावे, तसाच या गटण्याचा आणि माझा योग आला. ज्यांच्याकडे पाहिले म्हणजे अतीव करूणा खेरीज दुसरी कोणतीहीभावना जाग्रूत होत नाही अशा कारूण्यभजनांपैकी तो एक आहे. बाकी माणसे तरी चेह-यावर काय काय भाव घेऊन जन्माला येतात! कूणी सदैव अनाथालयाची वर्गणी मागायला आल्यसारखा, कुणी नुकतीच बस चुकल्यासारखा , कुणी सदैव आश्र्चर्यचकित, कुणी उगीचच अंतराळात, तर कुणी निष्कारण कपाळावर आठ्यांचे उभे गंध लावून.सखाराम गटणेच्या चेह~यावर हवा गेलेल्या फुटबॉलचा भाव आहे. त्याचे प्रथम दर्शन झाले तेदेखील त्याच भावात. वास्तवीक हा मुलगा माझा कोणीही नव्हे. माझ्या एका व्याख्यानानंतर ह्याची आणि माझी ओळख झाली. हा त्या वेळी मॅट्रीकच्या वर्गात होता. अर्ध्या विजारीत पांढरा सद्रा खोचलेला, त्याला नाकासमोर गांधीटोपी घातलेला, लहानसेसे भावशुन्य डोळे, काळा रंग, वेडेवाकडे दात- अशा थाटात हा मुलगा त्या हॉलच्या दारात उभा राहिला होता. मी हारतुरे घेऊन बाहेर आलो आणि त्याच्यावर नजर गेली. त्याने अत्यंत आदराने मला नमस्कार केला."स्वाक्षरी---" आपली वही पुढे करीत तो म्हणाला."छे छे, मी स्वाक्षरीबिक्षरी देत नाही." मी उगीचच टाफरलो."जशी आपली इच्छा--"त्याने दोन्ही हात जोडुन मला नम्स्कार केला. अगदी देवाला नमस्कारकरावा तसा. दुस-या एखाद्याने मला तसला नमस्कार केला असता तर मी चिडलोच असतो. पण सखाराम गटण्याचा नमस्कार इतका प्रामाणिक होता की, तो नमस्कार मला कुठेतरी जाऊन लागला. स्वाक्षरी नाकारण्याचा माझा हा काही पहीला प्रसंग नव्हता.वास्तविक मी स्वाक्षरी नेहमीच नाकारतो असे नाही. पण कधीकधी छ्योट्याछ्योट्या पोरांपुढे उगीचच शिष्टपणा करायची हुक्की येते. स्वाक्षरी देण्यात अर्थ नाही हे खरे; पण न देण्यातही काही खास अर्थ आहे असे नाही. सखारामगटणे कोप-यात उभा होता. तेवढ्यात संस्थेचे चिटणीस एक मोठे रजिस्टर घेऊन माझ्यापुढे आले.
मी ते रजिस्टर चाळू लागलो. त-हेत-हेच्या लोकांनी संस्था पाहून संतोष व्यक्त केला होता. मीदेखील असंतोष व्यक्त करावा असे काहीच घडते नव्हते, त्यामुळे दोनचार ओळीत संतोष व्यक्त केला. त्यानतंर आर्य्कारी मंडळाच्या सभासदांबरोबरचहापान (ग्लूको बिस्कीट, चिवडा आणि केळी!!) झाले. सभासंदाचा माफक विनोदही सहन करीत होतो. पण खिडकीबाहेर आपली वही घेऊन उभा असलेला सखाराम गटणे मला उगीचच अस्वस्थ करायला लागला होता. अगदी अनिमिष उभा असलेला तो चार-साडेचार फूट उंचीचा जीव--एखादी केरसूणी ठेवावी तसा राहीला होता. त्या मुलाकडे आता पाह्यचे नाही असे दहाबारा वेळा ठरवले. पण हट्टी असह्य झाले आणी मी चिटणीसांना त्याला बोलावून घ्यायला सांगितले."कुणाला? सख्याला?" चिटणीस आश्चर्याने म्हणाले."मला त्याचं नाव ठाऊक नाही. प्ण तो तिथे उभा आहे तो--""सख्याच तो. अरे ए गटण्या--"इतक्या लाबूंनदेखील सखाराम गटण्याचे दचकणे मला दिसू शकले, इतक्या जोरात तो दचकला. एखाद्या अपराध्यासारखा तो माझ्यासमोर उभा राहीला."काय नाव तुझं बाळ?" मी आवाजात जमेल तितका मऊपणा आणित विचारले."सखाराम आप्पाजी गटणे.""अक्षर झकास आहे बंर का ह्याचं! आमच्या व्याख्यानमालेच्या जाहिराती, बोर्डहाच लिहीतो. वडलांचं साइनबोर्डपेंटरचं दुकानच आहे, आप्पा बळवतं चोकात.""अरे, तुझं अक्षर इतकं झकास आहे मग स्वाक्ष-या कशाला गोळा करतोस?" ह्यात इतकं खास मोट्याने हसण्यासारखे नव्हते, पण मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद हसले. "कोणाकोणाच्या सह्या गोळा केल्या आहेस बघूं---""मी फक्त साहित्यिकांच्याच स्वाक्ष-या घेतो." स्वाक्ष-यांचे पुस्तक माझ्या हातीदेत सखाराम गटणे म्हणाला.मी त्याचे स्वाक्ष-यांचे पुस्तक चाळू लागलो. प्र्त्येक साहित्यिकाच्या लिखाणातून एक-एक वाक्य निवडून काढून गटण्याने त्याखाली त्या त्या साहित्यिकाची सही घेतली होती. मी शेवटले माझे पान उघडले. तिथल्या वाक्याखाली सही नव्हती."हे वाक्य कोणाचं आहे?""आपल्याच एका नाटकातलं!" सखाराम गटणे अत्यादरपूर्वक म्हणाला. संदर्भ सोडून काढलेले ते माझे वाक्य वाचताना माझी मलाच दया आली."हे वाक्य का निवडलंस तू बाळ?""हे वाक्य मला आपलं जिवनविषयक सूत्र वाटतं."
"बापरे!" मी मनात म्हणालो. त्या चार-साडेचार फुटी उंचीच्या दिनदुबळ्यादेहातून जीवनविषयक सूत्र वैगेरे श्ब्दांची अपेक्षा नव्हती. मी सखारामच्या चेह-याकडे पाहत राहिलो. कार्यकारी मंडळाच्या एका म्हाता-याशा सभासदावर गटण्याच्या'जीवनविषयक सूत्र' ह्या शब्दामुळे काहीतरी परिणाम झाला असावा. त्यांनी गटण्याला खुर्चीवर बसायला सांगितले."कशावरून? तू माझी पुस्तकं वाचली आहेस का?""आपली छापून आलेली ओळ न ओळ मी वाचली आहे. आपण आणि सानेगुरूजी हे माझे आदर्श लेखक आहात.""अरेम पण गेल्या खेपेला ते कोण आले होते त्यांना तू ते आणि सानेगुरूजी म्हणालास--"सेक्रेटरी ह्या मनुष्यविशेषाला पोच असता कामा नये असा अलिखित दंडक असावा. वास्तविक गटण्याने दुस-या एखाद्या लेखकालाही सानेगुरूजींच्या जोडीने बसवले असेल, किंबहुना आणखी एकदोन आडवड्यांत एखादा तिसरा साहित्यिक आला की तो आणि सानेगुरूजी अशीही जोडी होईल. ह्याचे मुख्य कारण गटणे अजून सानेगुरुजींच्या इयत्तेतून बाहेर पडला नव्हता; पण खिडकी बाहेरची इतर दुश्येही आता त्याला आवडायला लागली होती.सेक्रेटरीच्या बोलण्याने सखाराम हिरमुसला. मी विषय बदलण्याच्या द्रूष्टीने म्हणालो,"काय शिकतोस?""यदां एसेस्सीला बसणार आहे.""अस्सं!" मी त्याची ती अनेक साहीत्यिकांच्या जिवनविषयक सुत्रांच्या गुडांळ्यांनी भरलेली वही पाहत म्हणालो. स्वाक्षरीसाठी भित भित पुढे येणारा सखाराम गटणे हा काही पहीला नमूना नव्हता. अमुक अमुक इसम हा स्वाक्षरी घेण्यालायक आहे असा गैरसमज एखाद्या अफवेसारखा पसरतो. पण स्वाक्ष-या जमवण्या-या पुष्कळ पोरांच्या आणि पोरींच्या चेह-यावर बहुधा एक खट्याळ भाव असतो. वही पुढे सरकवताना चेह-याव्र असतो तो आदरांच्या बिलंदर अभिनय! सराईत स्वाक्षरी करणारांना तो ओळखू येतो. सखाराम गटण्याच्या चेह-यावरची रेषा न रेषा कमालीची करी होती. त्याचे ते लहानसहान डोळे काही खोटा, दडवलेला, लुच्चा व्यक्त करायला केवळ असमर्थ होते."आपण स्वाक्षरी दिलीत तर मी आजन्म अपकृत होईन."
सखाराम गटण्याच्या तोडूंन हे वाक्य ऎकताना त्याच्या तोंडात दातांऎवजी छाप-खान्याचे खिळे बसवले आहेत असे मला वाटते. हा मुलगा विलक्षण छापील बोलतो, पण भाषेचा तो छापीलपणा कमालीचा खरा वाटतो. मी त्याची वही उघडून माझ्याजीवनविषयक सूत्राखाली निमूटपणे सही केली. त्यानंतरचा सखाराम गटण्याच्या नमस्काराने माझ्या पोटात अक्षरशः कालवल्यासारखे झाले. साडेसातीने पछाडलेली माणसे शनीचा काटा काढणा-या मारूतीलादेखील इतका करूण आणि भाविक नमस्कार करीत नसतील. माझ्या आयूष्यात मी इतका कधीही ओशाळलो नव्हतो.'सखाराम गटणे' हा प्रकार त्या दिवशी माझ्या आयूष्याच्या खातेवहीत नोंदला गेला. ह्या घटनेला आता खूप वर्षे झाली. सखाराम गटणे त्यानंतर माझ्या घरी येऊ लागला. प्रथम आला तो दस-याच्या दिवशी सोने वाटायला. माझे काही मित्र घरीआले होते. त्यांतला एकानेही मी लिहीलेली एकही ओळ वाचलेली नाही आणि यापुढेही ते वाचणार नाहीत. त्यामुळे मैत्री अबाधीत आहे. रमी, फालतू गप्पा, जागरणे करण्याची अमर्याद ताकद, असल्या भक्कम पायावर ती उभी आहे. साहित्यीकमंडळीत एकूण माझा राबता कमीच! त्यामुळे एकटादुकटा अस्लो तर ह्या साहित्यविषयक गोष्टी मी सहन करू श्कतो. पण माझ्या ह्या खास मित्रांच्या अड्ड्यात मला माझा वाचकच काय, पण प्रकाशदेखील नको वाटतो.सखाराम गटणे आत आला आणि त्याने अत्यंत आदराने माझ्या पायाला हात लावून नमस्कार करून मला दस-याचे सोने दिले.माझे वाह्यात मित्र हे द्रुश्य पाहत होते."आपण मला कदाचित ओळखलं नसेल--""वा वा ! ओळखलं की! मागे एकदा व्याख्यानाला होता तुम्ही --""हे सुर्यानं काजव्याचं स्मरण ठेवण्यासारखं आहे!" गटण्याने सरवाप्रमाणे एक लेखी वाक्य टाकले.आता ह्या मुलाला काय करावे ते कळेना. बरे, मुद्दाम सोने द्यायला घरी आलेला. त्याला कपभर चहा तरी द्यायला हवा होता. गटण्याच्या चेह-यावरच्या भक्तिभावाने मी हैराण झालो होतो."मला आपल्याला काही प्रश्न विचारायचे होते.""आपण पुन्हा केव्हा तरी भेटु या. चालेल का?""केव्हा येऊ? आपल्या प्रतिभासाधनेच्या वेळा सोडुन कोणत्याही वेळा सांगा!"
मला त्याला ओरडून सांगावेसे वाटले, "मुला---अरे माणसासारखा बोल की रे. तुझ्या जिभेला हे छापील वळण कुठल्या गाढवानं लावलं? प्रतीभासाधनाची कसली डोंबलाची वेळ?... "पण ह्यातले काहीही मी म्हटले नाही. गटण्याच्या डोळ्यांत छप्पन्न संशाची व्याकुळता साठली होती. बोलताना त्याचे डोळे असे काही होत, त्याच्या कपाळावरच्या आणि गळ्याच्या शिरा अशा काही विचित्रपणे ताणल्या जात, की असल्या आविर्भावात त्या मुलाने एखाद्या शिव्या दिल्या तरी देखील त्या घेणा-याला ह्या देणा-याची दया आली असती. एथे तर त्याच्या जिभेवर साक्षात सरस्वतीने मराठी भाषेचा 'क्लास' उघडला होता."हे पाहा, पुढल्या आठवड्यात एखाद्या संध्याकाळी या.""निश्चित वार सांगू शकाल का आपण? नाही सांगितला तरी चालेल. मी रोज येत जाईन. प्रयास हा प्रतीभेच्या प्राणवायू आहे असं कुडचेडकरांनी म्हटलचं आहे.""कुणी?""स.तं. कुडचेडकर ---'केतकी पिवळी पडली' चे ख्यातनाम लेखक.""अस्सं!" कुडचेडकर नावाचा मराठीत कुणी साहित्यिक आहे, याचा मला पत्ताही नव्हता. आणि गटण्याला त्याच्या 'केतकी पिवळी पडली' (हे नाटक होते, कादंबरी होती की आणखी काय होते देव जाणे) पुस्तकातली वाक्ये पाठ होती.ह्या गटण्याची केस अगदीच हाताबाहेर गेली होती.गटणे त्यानंतर असाच सणासुदीला येत गेला. संक्रांतीची कार्डे, दिवाळिचे अभीष्टचिंतन, नववर्षाच्या सुभेच्छा वगैरे न चुकता पाठवीत असे. माझे कुठेही काही लिहून आले की आपल्या सुंदर अक्षरात ते वाचल्याचे कळवीत असे.अधूनमधून भेटातही असे.त्यानंतर एका संध्याकाळी सखाराम गटणे घरी आला. नेहमीप्रामाणे नाकासमोर टोपी, हातात पिशवी, असे त्याचे ते हडकुळे आणि डोळ्यावर घालीन लोटांगण असा भाव असलेले ध्यान येऊन दारात उभे राहिले."या!" मी त्याला आत बोलावले."आपल्या साधनेत व्यत्यय तर नाही ना आणला?""अहो, साधना कसली? आराम करीत पडलो होतो--""चिंतन वगैरे चालंल होतं का?""छे हो! चिंतनविंतन काही नाही. हं, काय, चहा घेणार?""नको. मी चहा घेत नाही. उत्तेजक पेयांपासून मी पहील्यापासून अलिप्त आहे."ह्या मुलाच्या मेंदूत पाण्याचे फवारे सोडून त्यातून ही सारी साहित्यीक श्ब्दांची जळमुटे धूऊन काढता येतील का, अशा विचारात मी पडलो."अहो, चहा हे उत्तेजक पेय आहे म्हणून कोणी सांगितलं?"
"उन्नती मासिकाच्या विजयादशमी अंकात चोखुरेगुरूजींच्या लेख आहे. 'जीवनोन्नतीचे सहा सोपान!'" 'जीवनोन्नतीचे सहा सोपान; हे शब्द गटण्याच्या वेद्यावाकड्या दातांतून पोरांच्या चड्ड्यांतून खिसे उलट केल्यावर गोट्या पडाव्यात तसे पडले!"माझं ऎकाल का गटणे--असले लेख नका वाचत जाऊ.""मी आपलं ह्याच बाबतीत योग्य मार्गदर्शन घ्यावं म्हणून आलो होतो.""कसलं मार्गदर्शन?""मला माझा व्यासंग वाढवायचा आहे. योग्य व्यासंगाशिवाय व्यक्यिमत्वाचा पैलूपडत नाहीत.""कुठल्या गाढवानं सांगितलं हे तुम्हाला?"गटणे दचकला. त्याच्या असंख्य गुरूजीपैकी कुठल्यातरी गुरूजीच्या पंच्याला मी नकळत हात घातला होता. गटणे गप्प उभा होता. त्याच्या त्या केविलवाण्या डोंळ्यात फक्त आसवे जमा व्हायची राहिली होती. मला हे माझ्या उद्गारांचा राग आला होता. पण गटण्याने एक एक वाक्य माझा अतं पाहत होत. ह्या मुलाला आता नीट बिघडवायचा कसा ह्या विचारात मी पडलो."हे बघा, प्याच थोडा चहा. यापूर्वी कधी प्यायला होतात ना?""हो-- पूर्वी पीत होतो." एखद्या महान पातकाची कबुली द्यावी तसा चेहरा करून गटणे म्हणाला.माझ्या आदेशानुसार तो चहा प्यायला. त्याच्या अनेक गुरूजीपैकी मीही एक होतो. चहा पिताना त्याच्या चेह-याकडे पाहवत नव्हते. सर्कशीत वाघाच्या ताटात शेळीला जेवायला लावतात त्या वेळी शेळीचा चेहरा कदाचीत तसा होत असेल. बाकी गटण्यात आणि शेळीत काहीतरी साम्य होते. शेळी झाडाची पाने खाते, हा पुस्तकांची पाने खात होता. त्याला मी जी जी काही आठवतील ती पुस्तके लिहून त्यांची यादी दिली. ती यादी वाचताना त्याच्या चेह-यावर विलक्षण कृतज्ञतेचा भाव दाडला होता. त्यांची यादी दिली. काहीतरी विस पुस्तकांची नावे असावित."ही मी वाचली आहेत.!""सगळी?" मी ख्रुर्चीवरून कोलमडायच्या बेतात आलो होतो."हो! पण पुन्हा एकदा वाचून काढीन.""छे छे-- पुन्हा कशाला वाचता?" वास्तविक मला त्याला सांगायचे होते की,"मित्रा, आणखी पाच वर्षे रोजचं वर्तमानपत्रदेखील वाचू नकोस."
'भस्म्या' नावाचा एक रोग असतो म्हणतात. त्यात माणसाला म्हणे 'खाय खाय' सुटते आणि खाल्ले की भस्म, खाल्ले की भस्म, अशी रोग्याची अवस्था होते. गटण्याला असलाच पुस्तकांचा भस्म्या रोग झाला असावा. ह्या मुलाला काय करावे मला कळेना. शेवटी मी माझे कपाट उघडले. त्यातली पुस्तके पाहिल्यावर खेळण्यांच्या दुकानात गेल्यावर पोरांचे चेहरे होतात तसा त्याचा चेहरा झाला."ह्यांतली वाटेल ती पुस्तकं घेऊन जा." वस्ता, तुजप्रत कल्याण असो'च्या चालीवर मी त्याला सांगितले."असा व्यासंग करायची इच्छा आहे माझी--"गटण्याच्या उद्गारांनी मला भयंकर शरमल्यासारखे झाले. त्या पुस्तकांतल्या निम्म्याहून अधिक पुस्तकांची मी पानेही फाडली नव्हती. आपल्या थैलीत पुस्तके भरून घेऊन गटणॆ गेला आणि मी सुटकेचा निःश्र्वास टाकला.आठ्दहा दिवसांनंतर एके दिवशी संध्याकाळी त्याचे ते "आपल्या साधनेत व्यत्यय तर आणित नाही ना मी?" हे वाक्य पुन्हा मला येऊन टोचले. त्याच्याहातात पुस्तकांनी भरलेली पिशवी होती. गटण्याने आठदहा दिवसांत ती सत्राअठराशे पाने खाल्ली होती. हा म्हणजे अल्लाउद्दिनच्या दिव्यातल्या राक्षचाच प्रकार झाला होता. 'दिलं पुस्तक की खा-- दिलं पुस्तक की खा--' हे काम कठीण होते."'काय, कशी काय वाटली पुस्तकं?" त्याला काहीतरी विचारणे प्राप्त होते. गटणे एक अक्षरही न बोलता उभा होता. मला वाटले माझा प्रश्र्न ऎकला नाही. म्हणून मी पुन्हा त्याला विचारले. गटण्याच्या डोळ्यांत पाणी तरारले होत्ते.मला कुणी रडायबिडायला लागले की काही सुचेनासेच होते. "काय रे, काय झालं?" एकदम त्याला अरेतुरे करायला लागलो. त्या आपुलकीने गटणे अधिकच मुसमुसायला लागला.रडताना तो एखाद्या लहान शाळकरी पोरासारखा दिसत होता. वास्तविक आता तो विशीच्या पलीकडे गेलेला होता. पण त्याला मी प्रथम पाहिला त्यानंतर त्याच्यात मला काहिच फरक वाटत नव्हता. अर्धी विजार जाऊन पायजमा-कोट आला होता. टोपीचे टोक अगदी तसेच नाकासमोर होते. आणि डोळ्यातंला भावदेखील कायम होता."काय झालें गटणे? रडू नकोस---""मला क्षमा करा.""पुस्तकं वाचायला वेळ नाही का झाला?""नाही, रात्रीचा दिवस करून आपल्या अनुज्ञेप्रमाणं मी पुस्तकं वाचून काढली--- हे पहा." एक वही माझ्या हातात देत तो म्हणाला.
"मग--" त्या तशा अवस्थेतदेखील त्याच्या 'अनुज्ञा' हा शब्द ऎकून मौज वाटली. ज्या वयात पाचपंचवीस इरसाल शिव्या तोंडात असाव्यात तिथे 'अनुज्ञा'', "मार्गदर्शन', 'जीवनानुभूती', 'साकल्याने मिळणारे समाधान' असली छापील शब्दांची अडगळ त्याच्या तोंडात आठली होती. मी त्याने अत्यंत सुवाच्य अक्षरात लिहीलेली वही उघडली."त्यात मी आपण दिलेल्या प्रत्येक पुस्तकाचं समालोचन लिहिलं आहे."गटण्याने प्रत्येक पानावर 'समालोचन' लिहीले होते. "पुस्तकाच्या वाचनाला लागलेला समय रात्री साडेआठ ते एक वाजून पस्तीस मिनीटे. पृष्ठसंख्या दोनशे बत्तीस पाने." अशा थाटात सुरूवातीचे कॉलम भरले होते. पुढे लेखकाचे संपूर्ण नाव, प्रकाशकाचे नाव, पत्ता, किंमत अस्ली माहीती होती--आणि मग खाली समालोचन होते. "कथावस्तू आकर्षक आहे. पात्रनिर्मीती वोलोभनीय आहे. कथा मुंबई, नागपुर व लखनौ ह्या तीन स्थळांत घडते..." असा प्रत्येक पुस्तकाचा सुंदरअक्षरात पंचनामा केला होता. गटण्याचा हा 'व्यासंग' पाहून मी थक्क झालो. शब्द तर डबक्यावर शेवाळ माजावे तसे माजले होते. नेत्रदीपक काय, आल्हाद काय, मनाची प्रगाढ खोली काय--छे! पोट साफ करायच्या औषधासारखे तोंडातले हे शब्द साफ करणारे एखादे ओषध का नाही निघत, ह्या विचारात मी पडलो. शेवटी काही तरी बोलायचे म्हणून मी म्हटले, "वा! खूप बारकाईअनं अभ्यास चालवला आहेस--""माझ्या जिवनातल्या वाडःयीन कालखंडातलं शेवटलं प्रकरण आहे.""म्हणजे?" हा मुलगा आता जीवजीव देणार आहे की काय अशी मला भीती वाटली, कारण असली पुस्तके खाऊन जगणारी मुले भलत्याच कुठल्यातरी श्रीमंताच्या नुसत्याच गो-या म्हणून सुंदर मानल्या गेलेल्या पोरींच्या प्रेमात पडतात आणि जीव तरी देतात किंवा डरपोक असली तर 'ऍंग्री यंग मेन' म्हणून चित्रविचीत्र पोशाख करून हिंडतात आणि दुस-याच्या खर्चाने कॉफीहाऊसमध्ये कॉफी पीत भयाण दिसणा-या, रोडक्या, माफक मिशीवाल्या पोरींबरोबर घाणेरड्या चित्रांतली आणि कवितांतली कला शोधत बसतात. पण गटण्या त्यांपैकी कशातच बसण्यासारखा नव्हता. नुसता फटाका फुटल्याचा आवाज सांगण्याचा प्रयास करीत होता, पण त्याला पुन्हा एकदा रडू फुटत होते. एकूण चमत्कारिकच प्रसंग होता.शेवटी गटण्याने आपले रडू आवरीत बोलायला सूरूवात केली."मला क्षमा करा. यापुढं मी अपल्याला कसलीच तसदी देणार नाही."
"म्हणजे?" मी आपल्या मित्रमंदळीत ह्या गटण्याची कधी तरी चेष्टा केली होती. ती ह्याच्या कानावर गेली की काय? पण ते शक्य नव्हते. आमचे मित्र आणि गटणे यांचा सबधंच येणे सभंवत नव्हते. एक पोलीस प्रॉसिक्युटर, एक मोटारीचे स्पेअर पार्ट विकणारा, कोणी फायर इन्शुरन्स एजंत, तर कुणी मिलीटरीतला कप्तान असल्या माझ्या कथाकाव्याच्या वाटेलादेखील चुकून न जाणा-या निरोगी मित्रांत मीच फक्त लेखनकामासाठी करणारा होतो. ते जगत होते आणि मी लिहीत होतो. आमच्या मित्रांच्या वासाने गटण्याला घेरी आली असती. मी गटण्याची समजूत काढायची म्हणून म्हटले, "अरे तसदी कसली?""तसं नाही. तुम्ही फार केलंत माझ्यासाठी. वटवृक्षाच्या शितल छायेत अनेक पांथस्थ येतात त्याची वटवृक्षाला काय कल्पना?"गटण्य़ाच्या ह्या वाक्याने गटणे 'नॉर्मल'वर आला हे मी ओळखले. मला वटवृक्षाची दिलेली उपमा पाहून उगीचच माझ्या नाकाखाली एक पांरबी लोंबायला लागली आहे असे मला वाटले आणी हसू आले."आपण माझ्या ह्या मुग्ध वाक्याला हसणं साहजिकच आहे. पण आपल्या मायेच्या शीतल छायेत बसणं माझ्या नशिबात नाही. जीवनात--""अरे पण--" मला ह्या 'जीवन' वगैरे शब्दांची भयंकर धास्ती वाटते. जगण्याला 'जीवन' म्हणावे अशी माणसे हजार वर्षातून एकदा जन्माला येतात. गटण्याने स्वतःच्या जगण्याला 'जीवन' म्हणणे म्हणजे सशाने स्वतःच्या टाळूला गंडस्थळ म्हणण्यापैकी होते. त्याचे ते जीवनापासून सूरू होणारे वाक्य मध्येच तोडून मी म्ह्टले, "अरे पण गटणे, झालं काय असं?""माझ्या जीवनात आता एक नवं पर्व सुरू होतंय!"मुलगा अगदीच हाताबाहेर गेला होता. साइनबोर्ड पेंटरचा हा मुलगा स्वतः जणू काही महाभारताचा नायक असल्यासारखा पर्वविर्व म्हणायला लागला होता."कसलं पर्व?""कसं सांगू?" आपले भित्रे डोळे पायच्या आंगठ्याला लावून गटणे म्हणाला.मग माझी खात्री झाली की, बापाच्या नावाचा बोर्ड रंगवून घ्यायला आलेल्या कुठल्या तरी मोटारीतून उतरणा-या गो-या तरूणीने गटाण्याचा खातमा केला. आजवर वाचलेल्या सर्व कादंब-यांचा कथानकांचे तात्पर्य ह्याच्या बापाच्या ध्यानी आले असणार आणि सखाराम गटणे तिथेच समात्प झाला असणार! शेवटी मीच होऊन त्याला विचारले,"कुठे प्रेमाविमात पडलास की काय?""नाही!" विजापूरच्या चिमुकल्या शिवाजीने छाती काढून बादशहाला सांगावे तशी आपली अठ्ठावीस इंची छाती काढुन तो म्हणाला, "आजच्या जगात विशुद्ध प्रेम कुठंच मिळत नाही."
कुणी सांगितलं तुला?""आपल्याच 'पाखरांची शाळा' नाटकातल्या नायकांच्या वाक्य आहे हे!"मी मनातल्या मनात कपाळाला हात लावला. 'पाखरांच्या शाळे' तले एक विनोदी पात्र हे वाक्य म्हणते. शेवटी मलाही हा प्रकार असह्य झाला आणि मी म्हटले,"मग झालं काय तुला? एवढा तरुण तू, इतका व्यासंगी--माझ्यापेक्षादेखील तुंझ वाचन दांडगं--आणि रडतोस?""काय करू? परिस्थिती हा अश्रूंचा सर्वात मोठा कारखाना आहे असं वाळिंबे म्हणत असत.""कोण वाळिंबे?""आमच्या प्राज्ञेचे सर!"तो कोण वाळिंबे भेटला असता तर जुन्या सुलतानासारखा मी त्याला उलटा टांगून पुस्तके जाळून त्याची धूरी दिली असती."असली काय परीस्थीती आली तुझ्यावर?""माझ्या वडिलांना माझ्या जीवनाचं ध्येय कळत नाही."माझ्या डोळ्यांपुढे सखाराम गटण्याचा पेंटर बाप आला. मी त्याला काळा की गोरा ते पाहिले नव्हते. बाकी पेंटर असल्यामुळे काळागोराच काय, तो अनेकरंगी असेल. त्या, अक्ष्ररे इंचावर मोजून रंग भरणा-या इसमाला त्याच्या घरात जन्माला आलेल्या ह्या बालबृहस्पतीचे जीवनध्येय काय कळणार? 'जीवनध्येय' म्हटल्यावर "कुठल्या साइजमध्ये लिहू साहेब?" म्हणणारा इसम तो!"काय जीवनध्येय कळंल नाही त्यानां?""त्यांनी माझं लग्न करायचं कुटील कारस्थान रचलंय!" गटण्याचे लहानसे जांभळट ओठ थरथरत होते."अरे, मग कुटील कारस्थान कसंल त्यात? तुला लग्न करायचं नसल तर नाही म्हणून सांग!""तिच विनंती करायला मी आलो होतो. मला माझं काही वाटत नाही जीवनाच्या समरात..."पुन्हा 'जीवन'! गटणे आता बाधं फोडून बोलत होता."...जीवनाच्या समरात रक्तबंबाळ व्हायचे प्रसंग यायचेच.""अरे, चांगलं लग्न ठरवताहेत वडील तर रक्तबंबाळ कसाला होतोस?""मला माझं काही वाटत नाही. मी वडिलांच्या आज्ञेनुसार विवाहबंधनात स्वतःला जखडून घेईनही! प्रभू रामचंद्र हा माझा आदर्श आहे! मीही वडिलांची अनुज्ञा पाळीन."प्रभू रामचंद्राने लग्न झाल्यावर अनुज्ञा पाळली होती हा तपशील गटणे विसरला. त्या एवढ्याशा देहातून प्रभू रामचंद्र वगैरे शब्द ऎकताना मला हसू आवरेना."बरं मग तुझं काय म्हणणं? मी तुझ्या वडलांना येऊन भेटू?""हे मी आपल्यावर सोपवतो. मी लग्नाला तयार आहे."आता मात्र मला कळेना की हा वीर जर मान उतरवून द्यायला तयार आहे तर मी जाऊन काय शत्रूच्या तलवारीला धार काढून देऊ?
"मी एकदा सोडून दहादा लग्नाला तयार आहे--पण मी आपणाशी प्रतारणा करू इच्छीत नाही." मी गटण्याच्या डोळ्यातं काही वेडाबिडाची झाक दिसते की काय ते पाहू लागलो."माझ्याशी कसली प्रतारणा?""आपण विसरलात म्हणून मी विसरणार नाही. आपल्या पहिल्या भेटीत दिलेली स्वाक्षरी मी रोज वाचतो. त्याच्यावर आपण संदेश दिला आहे-- 'साहीत्याशी एकनिष्ठ राहा!'"मी कोटटोपी घालून निमूटपणे त्याच्या वडलांना भेटायला गेलो. एका जुनाट वाड्यापुढे आमचा टांगा थांबला.वाड्यातल्या कुठल्या अंधे-या खोलीत आता मला हा माझा हनुमंत नेतो याची मी वाट पाहू लागलो. इतक्यात डाव्या बाजूच्या जिन्याच्या अंधारातून एक भरभक्कम गृहस्थ उतरला. चांगले भरघोस टक्कल,करवती मिश्या, कानाम्वर घनदाट केस, कपाळाला दुबोती उभे गंध, पोटाचा विस्तार पंच्यात्न डोकावणारा, पांढरे स्वच्छ धोतर नेसलेला. हा पन्नाशीतला धष्टपुष्ट गृहस्थ गटण्याचा बाप आहे हे कळल्यावर माझी छातीच धडधडायला लागली. मी त्यांना नमस्कार केला.गटण्याचा घराबद्दलची माझी कल्पना साफ खोटी ठरली. पेंटिंगचे दुकान हा गटण्यांचा अनेक व्यवसायापैकी एक होता. त्याच्या बापाने, रंगाचा तर सोडाच पण दाढीचा ब्रशदेखील हातात धरला नव्हता. कारण खाली उतरल्याबरोबर त्यांनी ओसरीवर उभ्या न्हाव्ह्याला आपण आज दाढी करणार नसल्याचे सांगितले, असल्या घनघोर माणसाच्या घरात साहित्याची मुळी कशी उगवली मला कळेना."या साहेब!" गटण्याच्या बापाने माझे रुंद आवाजात स्वागत केले."सख्या,आज जाऊन चहा सांग."बिळात उंदीर शिरावा तसा सख्या आत पळाला. अर्ध्या तासाच्या मुलाखतीनंतर पुण्यात गटण्यांच्या सहा इमारती आहेत ही माहिती मिळाली. गटण्याच्या घरात म्हता-या विधवा आतेखेरीज बाईमाणूस नाही हे समजले. आणि ती म्हातारी सध्या दम्याने हलकी होत चालल्यामुळे घरात बाईमाणूस येणे हे किती आवश्यक आहे ते कळाले. त्या वाघासारख्या चेह-याच्या बापाने सख्याची आई त्याच्या वयाच्या बाराव्या दिवशी वारल्यानंतर पुन्हा लग्न केले नव्हते.
"सावत्र आई म्हणजे काय साहेब मी स्वानुभवानं जाणतो. तुमच्यासारख्या विद्वान माणसाशी खोटं का बोलू? आजवर तीन बाया ठेवल्या!" बोटांतल्या पोवळ्याच्या आंगठीकडे पाहत गटण्याचा बाप म्हणाला," आज आपल्यासारख्यांचा आर्शीवादानं सारं काही आहे." गटण्याच्या बापची श्रीमंती आणि माझ्यासारख्याचा आर्शीवाद ही जोडी अजब होती. हे म्हणजे नळाच्या आर्शीवादाने पाऊस पडण्यापैकी होते. "काय वाटेल ते करा, पन पोराला लग्नाला उभा करा!" एवढा धिप्पाड माणूस माझ्यापुढे कोकरू झाला होता. "मुलगी नक्षत्रासारखी आहे साहेब! सोनगावकर सराफांच नाव ऎकल असेल आपण--" मी सराफांच फक्त नावचऎकतो हे मी गटण्याच्या बापाला सांगण्याचा मोह आवरला. "बुधवारात पाच घंर आहेत--- एकुलती एक मुलगी. चांगली शिकली आहे चारपाच यत्ता. शिवाय कूंडली जुळते आहे आणि सखा काहीतरीच खुळ्यासारखं धरून बसलाय. तुम्हाला वचनगेलंय म्हणतो.""छे छे!""वर या साहेब--"मग चारपाच काळोखे जिने चढून आम्ही सख्याच्या खोलीत गेलो. माझ्या खोलीत पुस्तकांचे एक कपाट होते; सख्याच्या भिंती पुस्तकांच्या कपाटांनी भरल्या होत्या. आणि भिंतीवर सानेगुरूजींच्या शेजारी माझ फोटो होता. त्याच्याखाली थेट माझ्या अक्षरात बोर्ड होता-- 'साहीत्याशी एकनिष्ठ राहा!' खाली माझ्या सही- सारखी सही होती.सख्याच्या लग्नात मी माझे सर्व पुस्तके त्याला भेट म्हणून दिली. प्रत्येक पुस्तकावर नवा संदेश लिहून दिला होता-'साहित्याशी एकनिष्ठ राहा आणि जीवनाशीही!'माझ्या हाताने 'जीवन' हा शब्द त्यानंतर लिहीला नाही. सख्या जीवनाशी एकनिष्ठ राहू लागल्याचे वर्षभरातच मला कळले. सख्याचे वडील स्वतः चांदीच्या वाटीतून नातवाचे पेढे घेऊन आले. काही वर्षापूर्वी सख्याने प्राज्ञेचे पेढे दिले होते; त्याच्या बापाने नातवाचे दिले.सखाराम गटणे मार्गाला लागला. त्याच्या 'जीवनातला' साहित्याचा बोळा निघाला.पाणी वाहते झाले!---------------------